कामाठीपुराचा चेहरा मोहरा बदलणार!

28 Dec 2022 13:24:46

कामाठीपुरा

मुंबई : “कामाठीपुरा परिसराचा समूहविकास पद्धतीने विकास करु, म्हाडाला नोडल एजंसी नेमून यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेऊन त्यांच्या मान्यतेने हा विकास करण्यात येईल”, असे फडणवीस यांनी सांगितले. “लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन स्थानिक प्रतिनिधींसोबत चर्चा करु. समूह विकासासाठी येथील लोक समोर येत आहेत, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना अपेक्षित असलेला हा विकास लवकरच घडवून आणू”, असेही . फडणवीस म्हणाले. “उमरखाडी प्रकल्पाबाबतही व्यवहार्यता तपासून बघण्यात येईल, इथे देखील समूहविकास अंतर्गत विकास करू”, असेही फडणवीस यांनी लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले. या संदर्भात सदस्य सर्व अमिन पटेल, सुनिल राणे आदिंनी लक्षवेधी उपस्थित केली होती
Powered By Sangraha 9.0