लव्ह जिहाद्यांना जशास तसे उत्तर द्या!

26 Dec 2022 18:44:31

Pradnya Singh Thakur




बंगळुरू : "
आपली संस्कृती ही अतिथी देवो भव, अशीच आहे. मात्र, अतिथी येऊन आपलं घर बळकावण्याच्या तयारीत आला तर त्यालाही उत्तर देणं आम्हाला येतं. त्यांच्याकडे जिहादची परंपरा आहे. काही नाही मिळालं तर लव्ह जिहाद करतात. आमच्याकडेही प्रेम करण्याची परंपरा आहे पण आमच्यात सन्यासी देवाकडे आपलं प्रेम व्यक्त करतो. पण देवाने बनविलेल्या या विश्वातही काही समाजकंटक फिरत असतात. त्यांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. आपल्या मुलींवर तसे संस्कार करा, लव्ह जिहाद्यांना त्यांच्याच प्रमाणे उत्तरे द्या. आपल्या घरातील चाकूला धार थोडी जास्त ठेवा, थोडंसं स्पष्ट बोलतंयं", असा इशारा भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिला आहे.


भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी लव्ह जिहादींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदुना त्यांच्यावर होणाऱ्या प्रत्येक अत्याचाराविरोधात लढण्याचा अधिकार आहे. कर्नाटकच्या शिवमोगामध्ये आयोजित हिंदू जागरण वैदिकच्या दक्षिण क्षेत्र वार्षिक सम्मेलनात त्या सहभागी झाल्या होत्या. यातील त्यांच्या भाषणाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी आपल्या घरातील चाकूची धार तपासून घ्या. तुमच्या घरात कुणी घुसखोरी करत असेल तर त्यांना उत्तर देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. असे म्हणत थेट लव्ह जिहाद्यांना इशारा दिला आहे.




कर्नाटकमध्ये हर्षा हिंदूच्या घरी दिली भेट

ज्या शिवमोगातील हर्षा हिंदूची पीएफआय कार्यकर्त्यांनी हत्या केली. त्याच्या घरी त्यांनी भेट दिली. तिथून फेसबूक लाईव्ह करत याबद्दलचा आवाज उठवला आहे. त्या म्हणाल्या. "हर्षावर २८ फेब्रुवारीला पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी तलवारींनी वार केले होते. तो रस्त्यावर तडफडत होता. पण तो योद्धा होता. तो हरला नाही. त्याने संपूर्ण कर्नाटकसह देशाला जागं केलं. पीएफआयवर बंदी आली. आज मी हिंदू जागरण मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून दक्षिण भारतात मुघलांसाठी लढणाऱ्या वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे."


त्या पुढे म्हणाल्या की, "आज मला वाटतंयं की मी एका वीर योद्ध्याच्या घरी जाऊन आली आहे. मला वाटलं होतं की त्याचे आई-वडिल, बहिणी दुःखी असतील. मात्र, मी आल्यावर दोन्ही बहिणींनी माझं हसतमुखाने स्वागत केलं. माझं औक्षण केलं. असं वाटत होतं की त्या योद्ध्यांच्या बहिणी आहेत. मला वाटलं की ते एका देशभक्ताचे आई-वडिल आहेत. मला असं वाटलं" मृत हर्षा यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटूंबियांचे सांत्वनही केले.


Powered By Sangraha 9.0