बार्टी संस्थेचा ४४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा .

24 Dec 2022 16:33:34

बार्टी संस्था


पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी संस्थेचा ४४वा वर्धापन दिन दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी विविध कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. बार्टी संस्थेच्या स्थापनेला ४४ वर्ष पूर्ण झाले असून बार्टीने अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे स्पर्धा परीक्षा, फिलोशीप, प्रशिक्षण , संशोधन क्षेत्रात भरीव असे काम केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या समतेच्या विचारांचा व संविधानिक मुल्यांचा प्रसार व प्रचार बार्टी संपुर्ण महाराष्ट्रात करत आहे. वर्धापन दिनानिमित्त बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा, वकृत्व ,गायन , नृत्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


बार्टी संस्थेचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांनी नागपूर येथील अधिवेशनातूनच ऑनलाईन पद्धतीने बार्टीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीमती स्नेहल भोसले, अपर जिल्हाधिकारी तथा विभागप्रमुख बार्टी, श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, प्रमुख पाहुणे डॉ वृषाली रणधीर, प्राचार्य नेस वाडिया महाविद्यालय पुणे, श्री राजेन्द्र बरकडे, सहाय्यक लेखाधिकारी, कार्यालय अधीक्षक सचिन जगदाळे, रितेश गोंडाणे, श्रीमती प्रज्ञा मोहिते, श्रीमती संध्या नारखडे, प्रकल्प व्यवस्थापक डॉ प्रेम हनवंते, नितिन सहारे, डॉ सारिका थोरात, श्रीमती सुभागी सुतार, डॉ पायल डोके, व्यवस्थापक बार्टी येरवडा, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नरेश गोटे, विकास गायकवाड, नसरिम तांबोळी, डॉ संभाजी बिराजे, डॉ अंकुश गायकवाड, विशाल शेवाळे, मंजुर तडवी, जनसंपर्क अधिकारी रजनी वाघ, रामदास लोखंडे आदी उपस्थित होते.


प्राचार्य वॄषाली रणधीर , अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. शासकीय सफाई कामगारांच्या मुला मुलीची निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा, खो खो, चित्रकला, नीबु चमचा, संगित खुर्ची,मेहंदी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.


विजेत्यांना श्रीमती नंदीनी आवळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा विभागप्रमुख, श्रीमती स्नेहल भोसले, अपर जिल्हाधिकारी तथा विभागप्रमुख , श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी पुणे, श्रीमती प्रज्ञा मोहिते कार्यालय अधीक्षक, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ प्रेम हनवंते प्रकल्प व्यवस्थापक, डॉ पायल डोके व्यवस्थापक येरवडा, श्रीमती जयश्री चेंडके, मुख्याध्यापक, यांच्यासह विद्यार्थी व पालक कर्मचारी उपस्थित होते.


अरुण गायकवाड निर्मीत हा महाराष्ट्राचा जल्लोष -महापुरुषाच्या गितांचा कला नॄत्य विष्कार हा गिताचा कार्यक्रम सादर करुन महापुरुषांच्या विचाराचा जागर केला. प्रस्ताविक श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी यांनी केले. सुत्रसंचलन डॉ.प्रेम हनवंते, प्रकल्प व्यवस्थापक यांनी केले. आभार विकास गायकवाड, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक यांनी मानले. यावेळी बार्टी संस्थेतिल अधिकारी व कर्मचारी, समतादुत, येरवडा व्यवस्थापनातिल कर्मचारी उपस्थित होते.बार्टी संस्थेचा ४४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा .

Powered By Sangraha 9.0