पुणे : भारतीय जनता पार्टीचे आमदार व जयकुमार गोरे हे आज पहाटे झालेल्या एका अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. गोरे यांच्या गाडीला पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळ अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात पडल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
त्यांना उपचारासाठी तातडीने पुण्याला हलवण्यात आले आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. भाजपाचे आमदार राहुल कूल, कार्यकर्ते रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत. जयकुमार गोरे यांच्या कार्यालयाकडून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळविण्यात आले आहे.