जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटाची निवड

02 Dec 2022 19:23:54

tath tkana
मुंबई : डॉ. पी एस रामाणी यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटाची निर्मिती विजय मुडशिंगीकर यांनी केली आहे. जयपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या वर्षी या चित्रपटाची निवड झालेली आहे. गिरीश मोहिते यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात उमेश कामत मुख्य भूमिकेत दिसत आहे. रामाणी यांची भूमिका उमेश यातून करता दिसेल.
 
गेल्या ६ वर्षांपासून jiff महोत्सव राजस्थानात पार पडतो. स्थानिक भाषेतील चित्रपटांना यात महत्व दिलेले असल्याचे संचालक आणि संस्थापक हनू रोज यांनी सांगितले. यावर्षी या महोत्सवासाठी भारतभरातून १२ चित्रपट निवडले गेले आहेत. तसेच पुढील वर्षीपासून भारताबाहेरील इतर भाषांतील चित्रपटांनाही यात समाविष्ट करून घेण्यात येईल असे तयावेळी म्हणाले.
 
भारतातील विविध भाषांत निर्माण झालेल्या चित्रपटांपैकी ताठ कणा या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक या सोहळ्याला उपस्थित होते. यावेलीव मुडशिंगीकर म्हणाले, हा विषय उत्तम होता. विखाक्यात शल्यचिकित्सक रामाणी यांचा जीवनपट लोकांसमोर आणायला मला आवडणार आहे. तसेच दिग्दर्शक तरुण भारताच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले, चरित्रपट बनवताना सामान्य चित्रपट दिग्दर्शित करताना घेण्यापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपट आपण बनवत आहोत त्या व्यक्तीला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्याला करायचा असतो. तो दिसतो कसा, बोलतो कसा, चालतो कास या सर्वांचे बारकाईने निरीक्षण करावे लागते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0