ऍसिड हल्ल्याची कंगना रनौतने सांगितली आठवण

15 Dec 2022 12:44:02
 

kangna 
 
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने दिल्लीत झालेल्या ऍसिड हल्ल्याविषयी आपले मत मांडताना काही वर्षांपूर्वीची आठवण सांगितली आहे. १७ वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला झाला प्रकरणी आपल्या मनातील भीती कंगनाने इंस्टाग्राम पोस्ट च्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
 
कंगना आपल्या पोस्ट मधून म्हणते, "मी किशोरवयीन असताना माझी बहीण रंगोली चांडेल हिच्यावर एका रोडसाइड रोमियोने ॲसिड हल्ला केला होता. तिच्यावर 52 सर्जरी करण्यात आले होते. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतका शारीरिक आणि मानसिक धक्का तिला बसला होता. एक कुटुंब म्हणून आम्ही पूर्णपणे खचलो होतो."
 
याचे स्पष्टीकरण देताना ती पुढे म्हणते, "बाहीवर जेव्हा हल्ला झाला त्याचे दूरगामी परिणाम आमच्या सर्वांच्या मनावर झालेत. मलाही सतत वाटायचे कि माझ्याही चेहेऱ्यावर कोणी ऍसिड फेकेल. रस्त्यावरून चालताना बाजूने एखादी मोटर बाईक किंवा कर जवळून गेली कि मी चेहरा लपवायचे."
 
क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या मागणीही मी पूर्ण सहमत आहे असेही ती यावेळी म्हणाली. या गुन्हेगारांना जास्तीत जास्त मोठी शिक्षा व्हावी अशी इच्छा गौतमने व्यक्त केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या आरोपीना खुलेआम फाशी देण्यात यावी अशी इच्छा गौतम यांनी व्यक्त केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0