आरएसएस विरोधी वक्तव्य पडले महागात; जावेद अख्तरला न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश

14 Dec 2022 12:04:53

javed santosh
 
मुंबई : जेष्ठ गीतकार जावेद अख्तर याना आर एस एस ची तालिबानशी तुलना केल्याबद्दल न्यायालयात हजर राहण्याचे आदेश झालेले आहेत. २०२१ मध्ये एका दूरचित्रवाणीवरील मुलाखतीत जावेद अख्तर अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानी संघटनेविषयी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानी कट्टरतावाद्यांशी केली होती. या त्यांच्या वादग्रस्त विधानावरून मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना कोर्टात हजार रहण्यासंबंधी समन्स बजावले आहेत.
 
या प्रकरणात टिप्पणी करणारे वकील संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. अख्तर यांनी राजकीय फायद्यासाठी असे विधान केल्याचा आरोप आहे. वैयक्तिक फायद्यासाठी संघाचे नाव नाहक गोवल्याचे दुबे यांचे म्हणणे आहे. कट्टरतावादी तालिबानी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यात काहीही साम्य नाही हे सर्वज्ञात आहेच.
 
मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने याची दाखल घेतल्यानंतर जावेद यांना समन्स बजावले आहेत. या केसची सुनावणी ६ जानेवारी २०२३ मध्ये मुलुंड न्यायालयात होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0