ओबीसी आरक्षण सुनावणी लांबणीवर !

13 Dec 2022 14:02:14
 

Supreme Court
 
 
 
 
मुंबई :  स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचने संदर्भात आजही निर्णय झालेला नाही. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सर्व याचिकाकर्त्यांना एकत्रित मुद्दे मांडणी करण्यास सांगितली आहे. आता पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाचा मुद्दा आणि आणि प्रभाग रचनेचा मुद्दा निकाली निघालेला नाही. वेगवेगळ्या याचिका दाखल असल्याने हा प्रश्न निकाली निघत नव्हता. त्यातच आता सुप्रीम कोर्टात नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत सर्व याचिकाकर्त्यांना एकत्रितपणे मुद्दे मांडण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने दिली आहे.
 
 
17 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत सूचनेनुसार मुद्दे मांडले गेल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0