ठाण्यात बारव-पुष्करणींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन संपन्न

13 Dec 2022 13:15:48
 
बारव-पुष्करणी
 
  
 
ठाणे : ठाण्यातील प्राच्यविद्या अभ्यास संस्था, विद्याप्रसारक मंडळ व महाराष्ट्र बारव मोहीम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवारी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील बारव-पुष्करणींच्या छायाचित्र प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभला. ही छायाचित्रे काढणारे प्रसिद्ध अभ्यासक रोहन काळे व त्यांच्या चमूने प्रदर्शनाला भेट देणार्‍यांना मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाला विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक विजय बेडेकर तसेच, अनेक मान्यवर मंडळी, विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. अशा प्रकारचे प्रदर्शन ठाण्यामध्ये प्रथमच भरवण्यात आले होते.
 
 
 
 
या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या. महाराष्ट्राला लाभलेल्या या बारव वास्तू शैलीचा खूप मोठा वारसा आहे. या मोहिमेच्या माध्यमातून रोहन काळे आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्रातील या अनोख्या बारव वाचवण्याचा प्रयत्न करीत असून ते या मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांनाही जागृत करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0