बांगलादेशविरुद्ध सामन्यात ईशान किशनने झळकावले द्विशतक !

10 Dec 2022 17:25:54

ishan kishan
 
 
 
 
इशान किशनने शनिवारी 10 डिसेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. त्याने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला. किशन 131 चेंडूत 210 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 24 चौकार आणि 10 षटकार मारले.
 
शिखर धवन बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. या दोघांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. ईशानने ८५ चेंडूत वनडे करिअरमधील पहिले शतक पूर्ण केले. त्याचे शतक हे भारताच्या डावातील २३.१ षटकात पूर्ण झाले होते. वनडेतील पहिल्या शतकानंतर ईशानच्या बॅटची धार आणखी वाढली.
 
टीम इंडियामध्ये आजच्या सामन्यासाठी दोन बदल करण्यात आले होते. ईशान किशन आणि कुलदीप यादव यांचा संघात समावेश करण्यात आला. किशन हा बांगलादेशमध्ये अर्धशतक करणारा युवा भारतीय सलामीवीर ठरला. कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे मायदेशी परतल्यानंतर सलामीवीर म्हणून ईशान किशन याला संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करत सुरुवातीला ४९ चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतरही त्याने आपला खेळ तसाच सुरू ठेवत आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. या शतकानंतर त्याचा धावांचा वेग आणखीच वाढला. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढत १३१ चेंडूवर २४ चौकार व १० षटकारांच्या मदतीने २१० धावा पूर्ण केल्या आणि तो बाद झाला. सामन्यात द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरले.
 
 
Powered By Sangraha 9.0