डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आठवलेंनी घेतला आढावा

    01-Dec-2022
Total Views |

Ramdas Athawale


मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक इंदूमिल स्थळी उभारण्याचा निर्णय झाला तेव्हा या स्मारकाचा सर्व एमएमआरडीएने करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला होता. तो निर्णय नंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकार बदलला असून समाज कल्याणतर्फे या स्मारकाचा खर्च केला जात आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 450 फूट भव्य पुतळा उभरण्यासाठी तयार करण्यात आलेले 25 फुटांचे पुतळ्याचे मॉडेल मागील दीड वर्षांपासून शासनाच्या मान्यतेसाठी पडुन आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकार ने दुर्लक्ष केल्यामुळे पुतळ्याच्या मॉडेल मान्यता मिळाली नाही.त्यामुळे इंदूमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या मॉडेल मान्यता देण्यासाठी राज्यशासनाने त्वरित समिती तयार करावी आणि सूचना मागवून पुतळ्याच्या मॉडेलला मान्यता द्यावी या सह इंदूमिल डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाबाबत च्या विविध मागण्यांसाठी आपण लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

 
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी इंदूमिल मधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक कामाची पाहणी केली. तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भीम अनुयायांसाठी उभारण्यात आलेल्या वॉटर प्रूफ मंडप व इतर सोयीसुविधांच्या तयारीच्या कामाची पाहणी रामदास आठवले यांनी केली. यावेळी मनपा उपयुक्त चंदा जाधव; अनेक मनपा अधिकारी तसेच नागसेन कांबळे; सिद्धार्थ कासारे; दयाळ बहादूर; रवी गरुड विवेक पवार; प्रकाश जाधव;घनश्याम चिरणकर; संजय डोळसे; रमेश गायकवाड; संजय पवार; रवी गायकवाड; सचिनभाई मोहिते; आदी मान्यवर उपस्थित होते.





आठवले म्हणाले, "इंदूमिल मधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य 450 फुटांचा पुतळा उभारण्यास किमान 2 ते अडीज वर्ष एवढा वेळ लागणार आहे. मात्र अद्याप त्या पुतळ्यासाठी आवश्यक मॉडेल ला शासनाने मान्यता दिलेली नाही. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्या मॉडेल मान्यता मिळवून देण्यासाठी आणि जनतेकडून सूचना मागवून पुतळा उभरण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पुतळ्यासाठी चे मॉडेल मान्य झाले की त्यानंतर पुतळा उभारण्यास किमान 2 वर्षे लागणार आहेत.आधीच्या सरकार ने बरीच दिरंगाई केली असून आता अजिबात वेळ वाया घालवता कामा नये. मी स्वतः शिल्पकार अनिल राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील वर्कशॉपया भेट देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे," असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.


इंदूमिल मधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक कामाचा खर्च 1 हजार 80 कोटी असून हा खर्च समाज कल्याण विभागातुन करण्या ऐवजी एमएमआरडीएनेच करावा या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. जगामध्ये अत्यंत उत्कृष्ट स्मारक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदूमिल स्थळी उभारण्यात येणार आहे.स्मारकाचं काम 2024 पर्यंत पूर्ण व्हावं अशा सूचना आपण अधिकाऱ्यांना केल्याचे रामदास आठवले म्हणाले. आंबेडकरांच्या पुतळ्याचे मॉडेल अद्यापही फायनल झालेलं नाही त्यामुळे हे मॉडेल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.


चर्चगेटमध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि सेंट्रल रेल्वे तसेच वेस्टर्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबई बाहेरून येणारे लोकांसाठी 14 स्पेशल गाड्या ठेवलेल्या आहेत आणि 12 स्पेशल लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या भीम अनुयायांसाठी मार्गदर्शन देखील केलं जाईल सर्व व्यवस्था असणार आहे .या सुविधांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.


शिवशक्ती भीमशक्ती या आधीच आम्ही केली आहे .उद्धव ठाकरे यांची टू थर्ड शिवसेना आमच्या सोबत आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर ती शिवशक्ती आणि वंचित शक्ती ची एकजूट ठरेल. भीमशक्ती आमच्यासोबत आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना भाजप आणि आरपीआय ची महायुती हीच खरी शिवशक्ती भीमशक्तीची एकजूट आहे असा दावा रामदास आठवले यांनी यावेळी केला



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.