उद्धव ठाकरेंचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे : नवनीत राणा

    01-Dec-2022
Total Views |

 Navneet Rana

मुंबई : उद्धव ठाकरेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोला खासदार नवनीत राणा यांनी लगावला आहे. उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हायला हवेत, असे विधान केले होते. त्याबद्दल नवनीत राणांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. नवनीत राणांनी खरपूस भाषेत उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.


राणा म्हणाल्या की, "आम्ही महिला कर्तृत्ववान आहोत. आपल्या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. आमच्या जिल्ह्यातून महिल्या महिला राष्ट्रपती लाभल्या. महाराष्ट्राला मुख्यमंत्री महिला नेतृत्व लाभल्यास आम्हालाही आनंद वाटेल. मात्र, ज्या व्यक्तींनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी असं बोलणं म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ज्याप्रकारे त्यांनी मुख्यमंत्री पदावर आपला दावा केला त्याप्रमाणे ते स्वतः मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहतात त्यामुळे ते दुसऱ्यांना मुख्यमंत्री होऊ देतील का?, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.