मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारीनं केला कोरियन युट्युबरचा विनयभंग

    01-Dec-2022
Total Views |

मुंबई
 
 
 
 
 
 
मुंबई : मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारीनं नावाच्या दोन गर्दुल्ल्यांनी कोरियन युट्युबरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अतिथी देवो भवंः मानणाऱ्या भारतीय संस्कृतीला काळीमा फासण्याचा प्रयत्न या दोन नराधमांनी केल्याचा प्रकार व्हीडिओत कैद झाला आहे. खार पोलीसांनी गुरुवारी पहाटे पाच वाजता दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या युट्युबरच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाल्याने तातडीने या आरोपींना पकडणे शक्य झाले.
 
 
 
 
नेमकं काय घडलं?
 
 
एक कोरियन युट्युबर महिला भारत भ्रमंतीसाठी आली होती. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर फिरतानाचा लाईव्ह व्हीडिओ तिनं युट्युब चॅनलवर सुरू केला होता. याच दरम्यान, खार परिसरात दोन गर्दुल्ले मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी या दोघांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तसेच जबरदस्तीही करत तिला बळजबरीने ओढत आपल्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. तरुणींने प्रसंगावधान राखून हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैदही केला.
 
 
 
 
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर हा प्रकार सुरू होता. पीडित तरुणीनं स्वतःला कसंबसं सावरत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गर्दुल्यांनी पुन्हा तिचा पाठलाग करत दुचाकीवर बसण्यास सांगितले. पुन्हा जबरदस्ती केली. तरुणीनं कशीबशी सोडवणूक करत यातून आपल्या बचाव केला. मात्र, घडलेला प्रसंग प्रचंड धक्कादायक होता, अशी प्रतिक्रीया तिनं प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.