‘एम्स’च्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त; ऑनलाईन सेवा लवकरच सुरू होणार

01 Dec 2022 11:23:02

एम्स
 
 
नवी दिल्ली : दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात ‘एम्स’च्या सर्व्हरमध्ये आलेला तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ही घटना म्हणजे ‘सायबर हल्ला’ असल्याचा आणि हॅकर्सद्वारे खंडणी मागितल्याचा दावा तथ्यहीन असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
 
 
गेल्या आठवड्याभरापासून ‘एम्स’च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून त्यामुळे रुग्णालयाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. ऑनलाईन प्रक्रिया ठप्प झाल्याने त्याचा ताण रुग्णालयाच्या विविध सेवांवर पडला आहे. हा बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असून त्यास यश आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, ‘एम्स’ प्रशासनाचे म्हणणे आहे की, ‘ई-हॉस्पिटल’चा ‘डेटा सर्व्हर’वर पुनर्संचयित करण्यात आला आहे. परंतु, ‘सर्व्हर’ सुरू करण्यापूर्वी संस्थेचे संपूर्ण संगणक ‘नेटवर्क’ व्हायरसमुक्त केले जात आहे. संस्थेत मोठ्या प्रमाणात संगणक असल्याने प्रक्रियेस विलंब होत आहे. त्यामुळे ‘ओपीडी’, विभाग आणि लॅबमध्ये तपासणी व उपचाराची सुविधा ‘मॅन्युअली’ सुरू राहणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.
 
 
 
‘एम्स’च्या सर्व्हरवर 2023 नोव्हेंबर रोजी रॅन्समवेअर हल्ला झाल्याची घटना घडली होती. तेव्हापासून ‘एम्स’मध्ये डिजिटल सेवा बंद आहे. संशोधन आणि शिकवण्याच्या कामासाठी डॉक्टर वैयक्तिक मोबाईलवरील इंटरनेटचा वापर करत आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0