जीएसटी कलेक्शन : महाराष्ट्रात सर्वाधिक २१ हजार ६११ कोटी रुपयांचा महसूल

01 Dec 2022 18:50:33

GST




नवी दिल्ली :
नोव्हेंबर २०२२ मध्ये एकूण जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) महसूल १,४५,८६७ कोटी रूपये आहे. त्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) २५,६८१ कोटी, राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) ३२,६५१ कोटी, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) ७७,१०३ कोटी (त्यामध्ये वस्तूंच्या आयातीवर जमा झालेले ३८,६३५ कोटी रुपयांचा समावेश आहे) आणि १०,४३३ कोटी रूपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या ८१७ कोटींसह) सेस अर्थात उपकर आहे.


सरकारने नियमित सेटलमेंट म्हणून आयजीएसटीमधून ३३,९९७ कोटी रूपये सीजीएसटीला आणि २८,५३८ कोटी रूपये एसजीएसटीला दिले आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये नियमित सेटलमेंटनंतर केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी ५९६७८ कोटी आणि एसजीएसटीसाठी ६११८९ कोटी आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी भरपाई म्हणून १७,००० कोटी जारी केले होते.


नोव्हेंबर २०२२ चा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा ११% जास्त आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हा महसूल १,३१,५२६ कोटी रूपये होता. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल २०% जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात मिळालेल्या महसुलापेक्षा ८% जास्त आहे.






Powered By Sangraha 9.0