दि. 2 ते 4 डिसेंबरदरम्यान ठाण्यात रंगणार पं. राम मराठे संगीत महोत्सव

‘पं. राम मराठे स्मृती पुरस्कार’ डॉ. मंजिरी देव यांना जाहीर ‘युवा पुरस्कारा’ने दीपिका भिडे-भागवत यांचा होणार गौरव

    01-Dec-2022
Total Views |


ठाणे

 

 

 
 
 
 
 
ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे यंदाचे 27वे वर्ष असून त्यानिमित्ताने संगीत रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत नाटकाची मेजवानी मिळणार आहे.
 
 
 
 
 
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना डॉ. मंजिरी देव यांनापं. राम मराठे स्मृती पुरस्कार’, तर गायिका दीपिका भिडे-भागवत यांनापं. राम मराठे स्मृती युवा पुरस्कारदेऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकतीच केली. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शुक्रवार, दि. 2 ते रविवार, दि. 4 डिसेंबरपर्यंत रंगणारा हा संगीतमहोत्सव नागरिकांसाठी विनामूल्य आहे. महोत्सवाच्या प्रवेशिका गडकरी रंगायतन, डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपलब्ध होणार आहेत.

 

 
 
 
 
या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार, दि. 2 डिसेंबरला सायंकाळी 7 वा. ’इंडीरुट्सया आगळ्या वेगळ्या प्रयोगाने होणार आहे. पाठोपाठ, ‘पं. राम मराठे स्मृती पुरस्काराचे वितरण होईल. गेली 45 वर्षे कथ्थक या नृत्यप्रकाराची अतुलनीय साधना करून आजवर कथ्थक नृत्याच्या अनेक शिष्या घडविणार्या डॉ. मंजिरी देव यांना संगीतभूषणपं. राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 
 
 
रोख रुपये 51 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे, तर गेली 20 वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणार्या व दहा वर्षे अध्यापनाचे काम करीत संगीताची साधना करणार्या दीपिका भिडे-भागवत यांनापं. राम मराठे युवा पुरस्कारप्रदान करण्यात येणार आहेघेणार्या व दहा वर्षे अध्यापनाचे काम करीत संगीताची साधना करणार्या दीपिका भिडे-भागवत यांनापं. राम मराठे युवा पुरस्कारप्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये 25 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
 
 
 
 
 
या सोहळ्यानंतर बेगम परवीन सुलताना यांचे गायन होणार असून त्यांना शादाब सुलताना खान या साथसंगत करणार आहेत. महोत्सवाच्या दुसर्या दिवशी शनिवार, दि. 3 डिसेंबर रोजी कथ्थक नृत्य सादरीकरण, सायं. 6 वाजता ठुमरी/दादरा/भजन यांची उपशास्त्रीय संगीत मैफल आणि रात्री 8.30 वाजता प्रख्यात सरोद वादनाचा कार्यक्रम होईल.
 
 
 
 
 
रविवार, दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ठाणेकरांची कला साधना हा कार्यक्रम होणार असून दुपारी 4 वा. ‘संगीत सौभद्रनाटकाचा प्रयोग होणार आहे, तर महोत्सवाची सांगता पं. शिवकुमार शर्मा यांना संगीतमय आदरांजली वाहून होईल.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.