मारेकरी आफताब पूनावालाची नार्को टेस्ट पूर्ण

    01-Dec-2022
Total Views |

आफताब पूनावाला
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : श्रद्धा वाळकरचा मारेकरी आफताब पूनावाला यांची नार्को टेस्ट गुरुवारी पूर्ण झाली. यावेळी पूनावाला याने बहुतांशी प्रश्नांची उत्तरे दिल्याचे समजते, त्यानंतर आफताबची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आली आहे.
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, आफताब पूनावाला याने नार्को चाचणीदरम्यान विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. त्याने बहुतांशी प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली. काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आफताबने थोडा वेळ घेतला. चाचणीदरम्यान आफताब अनेक प्रश्नांवर गप्प राहिला, परंतु त्यास ते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले असता त्याने उत्तरे दिली.
 
 
 
आफताबने नार्को चाचणीदरम्यान श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली. सुमारे दोन तास चाललेल्या नार्को चाचणीमध्ये आफताबने खून केलेल्या श्रद्धाचे कपडे आणि मोबाइल फेकल्याची माहिती दिली. यासोबतच आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी कोणते शस्त्र वापरले आणि कुठे फेकले हे देखील सांगितल्याचे समजते.



 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.