ठरलं! या दिवशी प्रदर्शित होणार 'आदिपुरुष'! वाचा का बदलावी लागली तारीख?

07 Nov 2022 14:43:24

aadipurush
 
 
मुंबई : आदिपुरुष चित्रपट जानेवारी २०२३ ला संक्रांतीच्या दिवशीप्रदर्षित होणार होता. परंतु अनेक वादग्रस्त कारणांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. चित्रपटाची नवीन तारीख आज ओम राऊत यांनी जाहीर केली आहे. हा चित्रपट येत्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार नसून जून महिन्यातील १६ तारखेस प्रदर्शित होईल.
 
आदिपुरुष हा चित्रपट अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याच्या पहिल्या पोस्टरपासून प्रेक्षकांनी चित्रपटावर टीका केली होती. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या रामाच्या आणि रावणाच्या प्रतिमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या नाहीत. प्रभास, सैफ अली खान आणि करिती सेनन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील तर चित्रापाचे दिग्दर्शन ओम राऊत करतील.
 
हा चित्रपट संक्रांतीच्या दिवशी प्रदर्शित होण्याचे ठरले होते. "आदिपुरुष हा चित्रपट नाही, तर प्रभू श्री रामावरील आमची भक्ती आणि आमच्या संस्कृती आणि इतिहासाप्रती असलेली वचनबद्धता आहे." असे म्हणत विलंब होण्यामागील पोस्ट-प्रॉडक्शनचे काम अपुरे राहिले आहे असे सांगत, चित्रपट निर्माते पुढे म्हणाले, “प्रेक्षकांना संपूर्ण दृश्य अनुभव देण्यासाठी, आम्हाला चित्रपटावर काम करणार्या् सर्वाना अधिक वेळ देणे आवश्यक आहे. आदिपुरुष आता १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होईल.”
 
 
 
Powered By Sangraha 9.0