मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासाबद्दल बोलताना विष्णुदास भावेंनंतर प्रशांत दामलेंचं नाव घ्यावचं लागेल : देवेंद्र फडणवीस

07 Nov 2022 17:37:54


उपमुख्यमंत्र्यांंनी दिली तिसरी घंटा आणि सुरु झाला प्रशांत दामलेंचा १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग!
मुंबई ( Prashant Damle ): मराठी रंगभूमिचे बादशाह प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या मराठी नाटकाचा आज मुंबईतील षण्मुखानंद नाट्यगृहात प्रयोग पार पडला. मराठी रंगभूमी आणि नाटक वेड्या मराठी प्रेक्षकाच्या मनावर राज्य करणारे अभिनेते प्रशांत दामले यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. आपल्या चार दशकांच्या मराठी रंगभुमीवरील प्रवासात दामलेंनी अनेक नाटकांतून अभिनय केला. आज दि ६ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या आयुष्यातील १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोगाला सुरुवात केली.
 
 
मास्टर ब्लास्टर सचिनने दिल्या शुभेच्छा
 
ट्विटरच्या माध्यमातून सचिन तेंडूलकर यांनी अभिनेते प्रशांत दामले ( Prashant Damle ) यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या ऑफीशिअल ट्वीटर अकाऊंट वरून सचिन यांनी म्हंटले कि,मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा १२,५०० वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या ह्या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
 
षण्मुखानंद येथील अभिनेते प्रशांत दामले ( Prashant Damle ) यांच्या कारकिर्दीमधील १२ हजार ५०० वा नाट्य प्रयोग पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,खासदार विनय सहस्त्रबुद्धे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार,ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह सिने आणि नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0