ऍक्टिवा मध्ये राहणारा नागोबा ; पहा व्हिडीओ कसे केले घर

04 Nov 2022 16:59:35

shnake
 



मुंबई
: इंस्टाग्राम वरून अनेक घटना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असतात. अशीच एक घटना अविनाश यादव या सर्पमित्राने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये दुचाकीच्या पुढच्या भागातून स्क्रू ड्राइव्हर च्या साहाय्याने एक मुलगा सापाला बाहेर काढताना दिसत आहे.





 
अविनाशने ज्या पद्धतीने अॅ क्टिव्हा स्कूटीमधून साप बाहेर काढला, ते खरोखरच धाडसाचे होते. कारण त्याच्या हातात साप पकडण्यासाठी काठीही नव्हती. अविनाशने व्हिडिओमध्येच सांगितले की, हे रेस्क्यू ऑपरेशन पहाटे 5 वाजता आहे. अविनाशने ऑक्टोबरमध्ये हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अविनाशने गंमतीने लिहिले की Activa च्या मालकाला Z+ सुरक्षा मिळाली आहे.




 
 
Powered By Sangraha 9.0