विक्रम गोखले यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

30 Nov 2022 18:20:01

vikraa
 
 
 
मुंबई : जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूने सर्व रसिक व चाहते शोकाकुल झाले. परंतु त्यांच्या मृत्यूला काहीच दिवस उलटून गेल्यानंतर त्यांनी काम केलेल्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या 'सूर लागू दे' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. व त्याला पत्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट सृष्टी गाजवली. विलक्षण व अभिजात अभिनय हि त्यांची ओळख होती. आपल्या पणजी आजीपासून त्यांना चित्रपटाचा वारसा लाभला होता. असा वारसा लाभलेलं हे अभिनेतेही तेवढ्याच ताकदीचे होते. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी अभिनयाची कास सोडली नाही. त्यांच्या मृत्यूनंतरही सूर लागू दे चित्रपटातरून ते आपल्या भेटीस येत आहेत.
 
हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर 'सूर लागू दे'च्या पोस्टरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0