मराठी चित्रपटांबाबत सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

30 Nov 2022 17:56:32

sudhi
मुंबई : गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट विक्रमी लौकिक मिळवत आहेत. या चित्रपटांकडे कथानक असते परंतु त्याला आर्थिक पाठबळ पुरविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.
 
गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
 
सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट उद्योगातील चित्रपट, टिव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते, तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि या चित्रपट निर्मात्यांनी अधिक चांगल्या सिनेमाची निर्मिती भविष्यात करावी हा उद्देश आहे.
 
काही दिवसांपूर्वी मनसे येते अमोल यांनी मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मध्ये स्लॉट मिळत नसल्याची ओरड केली होती तरी त्याबाबतही सुधीर यांनी वक्तव्य केले आहे. सुधीर म्हणाले, मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0