संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचे पहिले गाणे रिलीज

30 Nov 2022 16:02:53

ns
 
 
 
 
मुंबई : संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'वध'या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र होत आहे. अलीकडेच, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरने चित्रपटाच्या थरारक बाजूवर प्रकाश पडला. तसेच या कथेचा एक भावनिक पैलू देखील आहे. जो म्हातारपण जवळ आलेल्या मध्यमवर्गीयांच्या खडतर प्रवास आणि संघर्षांभोवती फिरत राहतो. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
 
 
आज 'वध'च्या निर्मात्यांनी 'मेरी सजा' हे गाणे रिलीज केले. मोफ्युजन चे संगीत आणि नवीन कुमारद्वारा लिखित या गाण्याचे कंपोझिशन लवी सरकार यांनी केले असून हे गाणे हार्दिक भारद्वाज यांनी गायले आहे. या गाण्यात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या पात्रांची कहाणी, तसेच त्यांच्या मुलाने आर्थिक मदत नाकारल्यावर त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. गुंड पालकांना त्रास देत असताना, त्यांचा मुलगा आपले जीवन जगत आहे आणि त्याच्या पालकांच्या परिस्थितीबद्दल कल्पना नाही असेही पाहायला मिळते.
 
 
अलीकडेच, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ह्याला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. तसेच, दर्शकांनी संजय मिश्रा यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारताना पाहिलं असून प्रेक्षक आता त्यांना पहिल्यांदाच पडद्यावर एक अनोखी व्यक्तिरेखा साकारताना पाहतील. 'वध'हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0