दृश्यम २ चे उल्लेखनीय यश ; १५० कोटींची विक्रमी कमाई

    30-Nov-2022
Total Views |

drishyam
 
मुंबई : अभिनेता अजय देवगण याचा दृश्यम २ चित्रपट प्रदर्शित होऊन आज १२ दिवस होऊन गेले आहेत. तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल होताना दिसतो आहे. पहिल्या दिवसातच ८ कोटींचे लक्ष्य पार करणारा हा चित्रपट १२ दिवसांत १५० कोटींची मर्यादा पार करून गेला आहे.
अजय देवगनच्या पहिल्या दृश्यम चित्रपटाने यशाचे शिखर गाठले होते. त्यामुळेच दृश्यम २ ची घोषणा करताच चाहत्यांना आनंद झाला. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मोठ्या शंकेने चित्रपट गृहात सह कुटुंब उपस्थित राहून त्यांनी आपली पसंती चित्रपटाला दिली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.