चीनमुळे कर्जबाजारी झालेल्या मालदीवच्या मदतीला धावला भारत; मदतीबद्दल मानले आभार!

    30-Nov-2022
Total Views |

Maldives
 
नवी दिल्ली : हिंद महासागर क्षेत्रात असलेल्या मालदीवला भारताने १०० दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत दिली आहे. भारतासोबतची आमची मैत्री घट्ट आणि ऐतिहासिक म्हणत मालदीवने भारत सरकारचे आभार मानले. हिंद महासागर क्षेत्रात वर्चस्व वाढवण्यासाठी चीनने एक मंच आयोजित केला होता, ज्यामध्ये मालदीवलाही बोलावण्यात आले होते, परंतु मालदीवने सामील होण्यास नकार दिला होता.
 
हिंदीत बोलताना मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद म्हणाले, “दोस्ती हमारी अच्छी है इसलिए रंग लाई है, दोस्ती हमारी गहरी है इसलिए सबको भाती है। दोस्ती समय की तरह चलती भी जाती है। अगर दोस्ती अपने जैसों से है तो इतिहास बनाती है।”
 
 
मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने 'चायना-इंडियन ओशन फोरम ऑन डेव्हलपमेंट कोऑपरेशन'मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. २१ नोव्हेंबर रोजी चीनच्या युनान प्रांतातील कुनमिंग येथे या मंचाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारत वगळता हिंदी महासागरातील सर्व देशांना आमंत्रित करण्यात आले होते.
 
मालदीवशिवाय ऑस्ट्रेलियानेही या बैठकीत सहभाग घेतला नाही. हिंद महासागरात वसलेला मालदीव हा चीनकडून कर्ज घेतलेला देश आहे. मात्र, श्रीलंकेप्रमाणे मालदीव चीनच्या जाळ्यात अडकला नाही. त्याचबरोबर शेजार धर्माचे पालन भारतानेही आपले कर्तव्य बजावत मालदीवला आर्थिक मदत केली आहे.
 
सध्या चीनचे तीन सर्वात मोठे कर्जदार देश श्रीलंका, पाकिस्तान आणि मालदीव आहेत. बिझनेस मॅगझिन फोर्ब्सनुसार, चीनने पाकिस्तानवर $७७.३ अब्ज डॉलरचे बाह्य कर्ज आहे. त्याच वेळी, मालदीवचे एकूण कर्ज त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GNI) 31 टक्के आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.