इस्रायली चित्रपट निर्माते म्हणे काश्मीर फाईल्स मधून केला काश्मिरी पंडितांचा अपमान

29 Nov 2022 12:22:08

kaashmir
 
मुंबई : इफ्फिच्या ज्युरींनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स चित्रपटावर टीका केली. हा चित्रपट प्रचारकी आणि असभ्य असल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले. ज्युरींच्या या वक्तव्यावर अनेक कलाकार तसेच रसिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
 
काश्मीर फाईल्स मधील अभिनेते आणि मूळचे काश्मिरी पंडित अनुपम खेर यांनी फोटो शेअर करून निषेधार्थ आपल्या ट्विटर हँड्लर वरून ट्विट केले आहे. अनुपम म्हणतात, "खोटेपणा कितीही मोठा असला तरी सत्याच्या तुलनेत त्याचं महत्त्व कमीच असतं."
 
अभिनेता दर्शन कुमारनेही आपल्या ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे. दर्शन कुमार म्हणतो, "आपण जे काही पाहतो किंवा ऐकतो त्यावर प्रत्येकाचं वेगळं मत असतं. मात्र तुम्ही तथ्याला नाकारू शकत नाही. द काश्मीर फाइल्स हा एक असा चित्रपट आहे जो काश्मिरी पंडितांचं दु:ख दाखवतो. ते आजही दहशतवादाविरोधात लढाई लढत आहेत. हा चित्रपट अश्लीलतेवर नाही तर सत्यावर आधारित आहे."
 
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया मांडली. अशोक म्हणतात, "इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाइल्सला असभ्य म्हणून दहशतवादाविरोधी लढलेल्या भारताच्या लढाईची खिल्ली उडवली आहे. भाजप सरकारच्या नाकाखाली त्यांनी सात लाख काश्मिरी पंडितांचा अपमान केला आहे. इफ्फीच्या विश्वासार्हतेवर हा खूप मोठा धक्का आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे."
 
चहू बाजूनी ज्युरींच्या बोलण्यावर टीका होत आहे. या सोहळ्यातील हे मुख्य ज्युरी आहेत. नदाव लॅपिड असे त्यांचे नाव असून ते इस्रायली चित्रपट निर्माते आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0