हातात पिस्तुल,सत्तेचा माज आणि डोक्यात दारूची नाशा; आप उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल!

    29-Nov-2022
Total Views |
Jogendra Singh
 
 
नवी दिल्ली : सत्येंद्र जैन यांचा जेलमधील राजेशाही थाटातला व्हिडीओ व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच आप उमेदवाराचे नवे कारनामे उजेडात आले आहेत. आपचे उमेदवार जोगेंद्र सिंह (बंटी) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोगेंद्र सिंह नशेच्या अवस्थेत हातात पिस्तुल घेऊन नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सिंह यांच्यासोबत आणखी काही लोक आहेत, जे एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिंह एमसीडी निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १९ मधून आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत.
 
भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी हा व्हिडीओ ट्विट करून म्हटले आहे की, “केजरीवाल सरकार, केजरीवालचे नगरसेवक… वॉर्ड क्रमांक १९ मधील आपचे उमेदवार, दारू आणि सत्तेच्या नशेत असलेले जोगेंद्र सिंह पिस्तूल घेऊन आहेत. भ्रष्ट मंत्री आणि गुन्हेगार उमेदवार, हाच आम आदमी पक्षाचा खरा चेहरा आहे. हा हार्डकोर पंक आहे! पण केजरीवालांसाठी तेही भारतरत्नसाठी पात्र आहेत!”
 
 
 
 
 
सत्येंद्र जैन आणि तिहार जेलमधील स्पेशीअल ट्रिटमेंट
 
४ डिसेंबर २०२२ रोजी दिल्लीत होणाऱ्या एमसीडी निवडणुकीपूर्वी, पक्षाचे मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून भाजपने 'आप'विरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आप नेते सत्येंद्र जैन मसाज करताना दिसत होते, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जैन खास जेवणाचा आनंद घेत होते.
 
 
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्याच्या बॅरेकच्या साफसफाईसोबतच लोक त्याच्या बेडची व्यवस्था करतानाही दिसत होते. यापूर्वी सत्येंद्र जैन तिहार तुरुंगाचे निलंबित अधीक्षक अजित कुमार यांच्याशी बोलताना दिसले होते. आता आपचे उमेदवार जोगेंद्र बंदुक घेऊन डिस्को करताना दिसत आहेत. गुजरातमध्येही भाजपने आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांचा नवा व्हिडिओ जारी केला आहे. स्वामिनारायण भक्तांच्या श्रद्धेला इटालियाने मूर्ख ठरवल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये इटालिया काही पंथीयांच्या खाण्याच्या सवयींवर गुजरातीमध्ये भाष्य करताना दिसत आहेत.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.