मुंबई : आपल्या धडाकेबाज कार्यवाहीसाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढेंना दोन महिन्यांतच पदमुक्त करण्यात आले आहे. या संदर्भात अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी मुंढेंना पत्र लिहून या संदर्भात कळविण्यात आले आहे. 'शासनाने आपली बदली केली असून आपण आपल्या आयुक्त कुटूंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य कुटूंबकल्याण यांच्याकडे सोपवावा, असे त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच मुंढे यांच्याकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या पदाचा कार्यभार प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य यांच्याकडे कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे पत्र गद्रे यांनी दिले आहे.