लव्ह जिहाद; अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करणारा फराज पोलिसांच्या ताब्यात!

    29-Nov-2022
Total Views |
 Love Jihad
 
 
पाटणा : पूर्णिया येथून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला बिहार पोलिसांनी हैदराबादमधून सुखरूप बाहेर काढल्याची माहिती आहे. याप्रकरणी आरोपी फराजलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. नॅशनल कमिशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन (NCPCR) ने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती देऊन नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर मुलीचे फोटो व्हायरल न करण्याचे आवाहनही लोकांना करण्यात आले आहे.
नॅशनल चाइल्ड प्रोटेक्शन कमिशनचे (NCPCR) अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी पीडितेच्या पुनर्प्राप्तीबाबत माहिती दिली आहे. या संदर्भात त्यांनी २९ नोव्हेंबर २०२२ (मंगळवार) सकाळी ९:२८ वाजता ट्विट देखील केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुलीचा फोटो आधीच शेअर केलेल्या लोकांना डिलीट करण्यास सांगितले आहे.
 
 
 
 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी फराजला ताब्यात घेण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना बनमंखी पोलीस स्टेशन प्रभारी यांनी देखील फराज आणि पीडितेच्या शोधात पोलीस पथक निघाल्याची माहिती दिली.
 
पुढील कारवाईसाठी पीडितेला आणि आरोपीला पूर्णिया येथे आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे पीडितेच्या तपासासाठी हिंदू संघटनांनी पूर्णियामध्ये निदर्शने केली होती.  स्टेशन प्रभारी मेराज हुसैन यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, या प्रकरणाला लव्ह जिहादचा संशय व्यक्त करण्यात येत आहे..
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.