अमृता देवेंद्र फडणवीस यांची दिव्याज फाउंडेशन तसेच गोवा सरकार आणि भामला फाउंडेशन यांच्या पुढाकाराने गोव्यातील बीच क्लीनोथॉन मोहिमेला सुरुवात.

    29-Nov-2022
Total Views |
Amrita Devendra Fadnavis
 
 
पणजी : गोवा  येथे सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया निम्मित गोवा सरकार, अमृता देवेंद्र फडणवीस यांची दिव्याज फाउंडेशन आणि भामला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बीच क्लीनोथॉन मोहिमेचे मीरामार बीचवर आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत गोव्यातील बीच स्वच्छतेसोबतच वेस्ट मॅनजमेंट, गोव्यातील सागरी जीव, वृक्षारोपण, खारफुटीचे संवर्धन आणि संरक्षण तसेच अक्षय ऊर्जा अशा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयांवर जनजागृती करण्यात आली.
 
 
या मोहिमेचा उद्घाटन सोहळा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता देवेंद्र फडणवीस, सुप्रसिद्ध सिने अभिनेता जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक रेमो डिसुझा, अभिनेते करण कुंद्रा तसेच गोवा पर्यटन विभाग, एन एफ डी सी इंडिया एंटरटेनमेंट सोसायटी, गोवा महोत्सव, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री, गोवा फुटबॉल असोसिएशन, सायकलिंग असोसिएशन ऑफ गोवा, पल्लवी श्रीवास्तव, कवीन शहा, संपत अय्यर, आणि डॉ. मिकी मेहता यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला.
 
मी या क्लीनोथॉन मोहिमेच्या निमित्ताने दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता देवेंद्र फडणवीस, भामला फाऊंडेशन, अभिनेते जॅकी श्रॉफ, रेमो डिसुजा, करण कुंद्रा आणि समस्त गोव्याच्या जनतेचे या मोहिमेस उपस्थित राहिल्याबद्दल जाहीर अभिनंदन करतो. तसेच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा "स्वच्छ सागर सुरक्षित सागर" हा संकल्प देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
 
आज या बीच क्लीनोथॉनच्या निमित्ताने गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोदजी सावंत यांचे अभिनंदन करते तसेच इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया) चे आभार मानते की त्यांनी या फिल्म फेस्टिवल दरम्यान बीच क्लीनींग, सस्टेनेबल एनर्जी, खारफुटीचं रक्षण आणि संवर्धन यांसारख्या महत्वाच्या मुद्द्याला हात घातला. "स्वच्छ भारत अभियान" आणि "स्वच्छ सागर सुरक्षित सागर" ही मोहीम दिवसेंदिवस अधिक बळकट होत चालली आहे अशी भावना अमृता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.