मला बेळगावात अटक होऊ शकते, राज्य सरकारनं दखल घ्यावी : राऊत

28 Nov 2022 19:03:00

Sanjay Raut

मुंबई : बेळगावातील प्रक्षोभक भाषणाविरोधात मला कोर्टात हजर करुन माझ्यावर हल्ला होऊ शकतो. तसेच तिथल्या न्यायालयात मला हजर करुन अटक करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी माहिती माझ्याजवळ गेल्या काही दिवसांपासून आहे. ३० मार्च २०१८ रोजी केलेल्या एका भाषणाचा संदर्भ देऊन मला अटक करण्याचा प्रयत्न होत असल्याची प्रतिक्रीया खासदार संजय राऊतांनी दिली आहे.


"कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चार दिवसांपूर्वीच्या वक्तव्य ताजे असताना मला आलेली नोटीस हा त्याचाच भाग आहे. बाळासाहेबांनी सीमाप्रश्नासाठी तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे. शिवसेनेने सीमाप्रश्नासाठी मुंबई पेटवली आहे. त्यामुळे ती धग आमच्या मनात आहे. आम्ही भीत नाही. बेळगावमध्ये कोल्हापूर मार्गे हजारो जाऊ. मला वॉरंट आलं असेल. अटकेसंदर्भात जर माझ्यावर टांगती तलवार असेल तर त्याच्याशी निश्चित लढू", असेही राऊत म्हणाले.

संजय राऊतांना १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. याबद्दल मी उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे, या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यात दम नाही. त्यामुळेच त्यांनी ही नोटीस पाठविली आहे. शिवसेना डरपोक नाही. मी आता उद्धव ठाकरेंशी बोलून याबद्दलचा निर्णय घेईल. आप क्रोनोलॉजी समझ लिजीए, असेही ते म्हणाले.




Powered By Sangraha 9.0