हिंमत असेल तर सीएएची अंमलबजावणरी रोखून दाखवा

सुवेंदू अधिकारी यांचे ममता बॅनर्जींना खुले आव्हान

    28-Nov-2022
Total Views |

Suvendu Adhikari's open call to Mamata Banerjee
 
 
 
 
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी मुख्यमंत्री
यांना राज्यातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (सीएए) अंमलबजावणी थांबवून दाखवण्याचे खुले आव्हान दिले.
 
 
सीएए कायदा असे म्हणत नाही की कायदेशीर कागदपत्रे असलेल्या रहिवाशाचे नागरिकत्व काढून घेतले जाईल, असे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर येथे झालेल्या बैठकीदरम्यान ते म्हणाले. ठाकूरनगर हा मतुआबहुल परिसर असून या समाजाची मुळे बांगलादेशात आहेत.
 
 
मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत नंदीग्रामचे आमदार सुवेंदू म्हणाले की, आम्ही सीएएबद्दल अनेकदा बोललो आहोत. राज्यात सीएए लागू होणार आहे. तुमच्यात हिंममत असेल तर त्याची अंमलबजावणी थांबवून दाखवा.
 
 
कलम 370 प्रमाणे सीएएचे वचनही पूर्ण होणार. आपल्या मुद्द्यावर जोर देताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की, 2019च्या लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर मोदी सरकारने काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, जे पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे भाजप सीएए लागू करण्याचे आश्वासन पूर्ण करेल. केंद्र सरकार कोणाचेही अधिकार काढून घेणार नाही आणि अशी चर्चा करणार्‍यांनाच वातावरण बिघडवायचे आहे. सीएएबाबत अमित शाह यांचे वक्तव्य.
 
 
 
यापूर्वी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान उघड शब्दांत सांगितले होते की, जे लोक सीएए लागू न करण्याबाबत स्वप्न पाहत आहेत, ते मोठी चूक करत आहेत. ते म्हणाले की, सीएए कायद्याची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. कारण त्याबद्दल नियम बनवायचे आहेत, त्यावर काम करणे बाकी आहे. याआधीही अमित शाह यांनी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये सीएए लागू करण्याचा उल्लेख केला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.