शरीरप्रकृती आणि रोगप्रवणस्थिती (20)

28 Nov 2022 20:35:22
 
Physique
 
 
 
 
डॉ. एडवर्ड यांनी शरीरप्रकृतीचे जे वर्गीकरण केले, त्यात असे अनुमान काढले की, शरीरामध्ये कमी-अधिक प्रमाणात असणार्‍या क्षार व खनिजे यांनी शरीराच्या प्रकृतीवर परिणाम होत राहतो आणि त्याचप्रमाणे शरीराची ठेवण व तसेच प्रकारचे आजार त्यांना होत असतात. त्यांनी वर्गीकरण केलेली पहिली शरीरप्रकृती म्हणजे 1) उरीले-पळीीेंसशपेळव उेपीींर्ळीीींंळेप. शरीरामध्ये कार्बन व नायट्रोजन या दोन घटकांच्या जास्तीच्या प्रमाणामुळे ही प्रकृती तयार होत असते. या प्रक्रियेत शरीरातील कार्बन व नायट्रोजनचे प्रमाण सर्वसाधारण पातळीपेक्षा वाढीला लागते व त्यामुळे शरीरातील पेशीस व उती या पुरेसा प्राणवायू शोषून घेऊ शकत नाहीत. पेशींना प्राणवायूचा पुरवठा कमी पडू लागला की, मग त्यापेक्षामध्ये ऊर्जा तयार होण्याचे काम मंदावते.
 
 
 
पेशीमधील जे ऊर्जाकेंद्रक ज्याला आपण ’मायटोकॉण्ड्रीया’ असे म्हणतो, त्यात ऊर्जा तयार होत नाही व पर्यायाने शरीराला हे घटक कमी प्रमाणात मिळू लागतात व त्यामुळे विविध क्षार, जीवनसत्व व खनिजांची शरीराला कमतरता भासू लागते. शरीराच्या विविध कार्यांना सुरळीतपणे चालवण्यासाठी विविध क्षार, जीवनसत्वे व खनिजांची गरज असते. जर हे योग्य त्या प्रमाणात मिळाले नाही, तर शरीराची कार्ये मंदावतात व त्यानंतर शरीराला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आजार होऊ लागतात.
जेव्हा डॉ. हॅनेमान यांनी ‘मायाझम’चा अभ्यास केला, त्यावेळी त्यांनी सोरा, सिफोलीन व सायकोसीस असे तीन प्रमुख ‘मायाझम’ सांगून ठेवले, जे आजाराचे मूळ कारण होते. त्यामधील ‘सोरा’ हा घटक 'Carbo-nitrogenoid constitution' प्रकाराला लागू पडतो.
 
 
या प्रकारच्या शरीर प्रकृतीमध्ये ओझोनची कमतरता असते व कार्बन जास्त असतो. होमियोपॅथीमध्येही अनेक औषधे अशी आहेत की, या प्रकारच्या शरीर प्रकृतीला ती साजेशी आहेत. ज्या होमियोपॅथीच्या औषधांचा ‘हायड्रोकार्बन’ व ‘अल्बुमिमॉईजस’ वर परिणाम होतो व या परिणामानंतर त्यातून ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू बाहेर पडतो, अशा औषधांची या शरीर प्रकृतीला फार गरज असते. उदाहरणार्थ, आपण काही औषधांची नावे पाहू, जी यात फार उपयुक्त असतात.
 
 
वनस्पतीजन्य औषधांमध्ये -
 
कॅम्फोरा, एकोमाईट नेपॅलस, हरिबीन्थ, डल्कामारा, कॅमोमिला, लायकोपोडीयम, हायोसायमस, डीजिटॅलीस, नक्सव्होमिका इत्यादी.
 
 
प्राणिजन्य औषधांमध्ये- एपिस मेलीफिका.
 
 
खनिजजन्य औषधांमध्ये-
 
क्युपरम मेटॅलिकम, फॉस्फरस, सल्फर, मरक्युरी, ऑरममेट, अर्जेंटम, प्लंबम मेटॅलिकम, प्लॅटिनम मेटॅलिकम इत्यादी औषधे येतात.
 
 
यापुढे या शरीर प्रकृतीचे काही महत्त्वाचे गुणधर्म आपण पाहणार आहोत.
 
- डॉ. मंदार पाटकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0