अजरामर भूमिका साकारून चित्रपट सृष्टि गाजवणारे विक्रम गोखले

    24-Nov-2022
Total Views |

asa
 
 
 
बाईंच्या तालमीत तयार झालेले अभिनेते, त्यांना जन्मजातच अभिनयाचा वारसा लाभला होता. आपल्या आजी आणि अगदी पणजीपासून अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं. त्यानंतर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा त्यांनी रंगभूमीवर व त्यानंतर चित्रपट सृष्टीवर उठवला. प्रसिद्ध दिग्दर्शक, नव्या रंगभूमीच्या प्रवर्तक विजया मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अभिनयाचे धडे मिळाले.
 
 
हम दिल दे चुके सनम, भूलभुलैया अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात अजून कोरलेल्या आहेत. रंगभूमीपासून सुरुवात करून चित्रपटही त्यांनी गाजवले. मराठी चित्रपट सृष्टीनंतर बॉलिवूड सुद्धा गाजवले. लोकमान्य टिळकानाच्या जीवनावर आधारित माहितीपटात सुद्धा त्यांनी काम केले आहे.
 
 
त्यांना अभिनयासाठी अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. विष्णुदास भावे यांच्या नावे दिला जाणारा मनाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. २०१६ मध्ये राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे ‘राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाला होता. त्याचबरोबर, संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांना गौरविले गेले होते.
 
 
अग्निपथ, बॅरीस्टर अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका गेल्या आहेत. अगदी अलीकडे प्रदर्शित झालेल्या गोदावरी चित्रपटातूनही त्यांनी काम केले होते. या सर्व चित्रपटांत व नाटकांत त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत.
 
 
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सध्या ते अत्यवस्थ्य आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी प्रार्थना करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी आवाहन केले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.