पणजीपासून लाभला होता अभिनयाचा वारसा; स्वतःच्या पायावर उभी केली नवी ओळख

    24-Nov-2022
Total Views |

asa
मुंबई : काळ सायंकाळपासून जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रतिकृती खालावली आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांना वेगळे काही देणारे आणि त्याचबरोबर आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी चाहत्यांच्या मनावर उमटवला. आपल्या घरातूनच अगदी पणजी आजीपासून त्यांना कलेचा वारसा लाभला होता.
 
प्रख्यात अभिनेत्री दुर्गाबाई कामात या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्री. हे बाळकडू त्यांना आपल्या रक्तातूनच लाभलं होत. तर आजी कमलाबाई गोखले या चित्रपटांतील पहिल्या बाळ कलाकार. या दोन स्त्रियांच्या खंबीर तालमीत तयार झालेले त्यांचे वडील, चंद्रकांत गोखले यांनी ७० पेक्षा अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांत काम केले होते. अनेक नाटकांतून त्यांनी रंगभूमी गाजवली. अशी अभिनयाची समृद्ध परंपरा विक्रम गोखले याना लाभली.
 
इतक्या समृद्ध घरात जन्म घेऊनही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण विक्रम यांनी केली. आपल्या अभिनयाबरोबरच व्यक्तिमत्वच आणि विचारांचा वारसा ते पुढच्या पिढीला देऊन गेले. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.