सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदी मुस्लीम व्यक्ती : कुमारस्वामी

    24-Nov-2022
Total Views |
kumar

हैदराबाद
: कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर आतापासूनच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता जनता दल सेक्युलरचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी कर्नाटकात सत्तेत परतल्यावर त्यांचा पक्ष जे.डी.एस एका मुस्लीम नेत्याला मुख्यमंत्री बनवेल, असे प्रलोभन त्यांनी जनतेला दिले. पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी जे सध्या कोलार जिल्ह्याच्या पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘पंचरत्न यात्रे’चा भाग म्हणून भेट देत आहेत.

 मुस्लीम मुख्यमंत्र्यांबाबत कुमारस्वामी म्हणाले की, “पक्षाचे अध्यक्ष सीएम इब्राहिम यांनी म्हटले आहे की, जनता दल (एस) पुन्हा सत्तेत आल्यास त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. कुमारस्वामी मंगळवारी कोलारमध्ये म्हणाले की,वसंतनरसापुरा येथे एका दलित तरुणाने मला भेटून त्याच्या समस्या सांगितल्या. यानंतर मी जाहीर केले की, माझा पक्ष सत्तेवर आल्यास उपमुख्यमंत्रिपद दलितासाठी तयार केले जाईल. ” ते पुढे म्हणाले की, “काँग्रेसमध्ये खूप संघर्ष केल्यानंतर जी.


परमेश्वर उपमुख्यमंत्री झाले आणि गोविंद करजोल यांचे नाव भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडला पुढे करावे लागले आणि हे दोन्ही नेते दलित समाजातून आलेले आहेत. त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभाग पुरेसे काम करत नसल्याचा आरोप करत महिलांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्रिपदी एका महिलेची नियुक्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.