प्रताप सरनाईकांकडून ७५ तोळं सोनं तुळजाभवानीला अर्पण

    24-Nov-2022
Total Views |

Pratap Sarnaikठाणे :
एकनाथ शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला ७५ तोळे सोने अर्पण केले आहे. मार्गशीर्ष मासारंभानिमित्त आमदार प्रताप सरनाईक सहकुटूंब तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांनी तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले. सरनाईक म्हणाले, "तुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसेच दोन्ही नातवंडांचे जायवळ करायचे होते. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. नवस केला होता तेव्हा ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्याचा हार देईन असं म्हटले होते. मध्यंतरी करोना काळ आणि काही संकटांमुळे येता आलं नव्हते. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो.” असेही ते म्हणाले. देवीकडे मांडलेलं गाऱ्हाणं पूर्ण झाल्यानेच पत्नी, दोन्ही मुलं, सूना आणि नातू यांना घेऊन आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.