राहुल गांधी इराकी हुकुमशाह सद्दाम हुसेन सारखे दिसतात! : हिमंता बिस्वा सरमा

    24-Nov-2022
Total Views |
 himanta biswa sarma rahul gandhi
 
 
 
गांधी नगर ( himanta biswa sarma rahul gandhi ) : भाजपचे फायरब्रँड नेता आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी खा. राहुल गांधी यांच्या नव्या लुकवर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या राहुल गांधी इराकी हुकुमशहा सद्दाम हुसेन यांच्या सारखे दिसत आहेत, अशी घणाघाती टीका सरमा यांनी गुजरात विधानसभा प्रचारसभेत केली. राहुल यांनी आपला लुक माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल किंवा महात्मा गांधी यांच्यासारखा का नाही ठेवला? असा प्रश्न सरमा यांनी उपस्थित केला आहे.
 
 
राहुल गांधींच्या नव्या लुकबद्दल ( himanta biswa sarma rahul gandhi )बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले कि, तुमच्या रूपातून सद्दाम हुसेनची नाही तर गांधीजी,वल्लभभाई पटेल यांची झलक दिसायला हवी. सध्या आसामच्या मुख्यमंत्र्यांचे हे विधान सोशल मिडीयावर चांगलेच गाजते आहे.
 
 
हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'वर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसने बॉलिवूड स्टारला पैसे दिले असावेत असा आरोपही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला. अभिनेत्री पूजा भट्ट, रिया सेन, अभिनेता अमोल पालेकर यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स राहुल गांधींसोबत सामील झाले आहेत.
 
 
सीएम सरमा म्हणाले, ते गुजरातमध्ये बेपत्ता आहेत. गेस्ट फॅकल्टी म्हणून ते राज्यात येतात. हिमाचल प्रदेशातही त्यांनी प्रचार केला नाही. ज्या ठिकाणी निवडणुका नाहीत अशाच ठिकाणी ते भेटी देत आहेत. कदाचित त्यांना पराभवाची भीती वाटत असेल, अशी शंका सरमा यांनी उपस्थित केली.
 
 
सीएम सरमा यांच्या वक्तव्यानंतर ( himanta biswa sarma rahul gandhi ) काँग्रेस त्यांच्यावर आक्रमक झाली आहे. आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोरा म्हणाले, “सरमा यांना फक्त हेडलाइन्स बनवायच्या आहेत आणि त्यासाठी ते राहुल गांधींचे नाव घेत आहेत. सरमा काहीही बोलू शकतात. त्यांच्या अशा विधानांकडे आपण लक्ष देत नाही. तर राजस्थान काँग्रेसचे नेते प्रताप सिंह खाचरियावास म्हणाले, “हा तोच व्यक्ती आहे जो एकेकाळी राहुल गांधींची स्तुती करत असे. आज ते राहुल गांधींची सद्दाम हुसेनशी तुलना करणारे लाजिरवाणे विधान करत आहेत. सरमा यांच्यासारखे लोक गुन्हेगार असून त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये. भाजपने राहुल गांधींकडून शिकावे. भारत त्यांच्या डीएनएमध्ये आहे आणि ते राष्ट्रध्वज हा त्यांचा धर्म मानतात."
 
सीएम सरमा यांच्या या वक्तव्याची ( himanta biswa sarma rahul gandhi )  केवळ काँग्रेसच्या राजकीय वर्तुळातच नाही तर सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे काही यूजर्सनी राहुल गांधींच्या लूकवरही कमेंट केल्या आहेत. राकेश कदम नावाच्या युजरने लिहिले की, सद्दाम हुसेनसारखे नाही, तर राहुल गांधी हे बेघर व्यक्तीसारखे दिसतात. बाबामुरुगन नावाच्या युजरने लिहिले की, “सद्दाम हुसैन पप्पूच्या रूपात जिवंत आहेत.अमेरिकेने संपूर्ण जगाचा विश्वासघात केला आहे.
 
 
मात्र, सीएम सरमा यांच्या वक्तव्यावर टीका करताना ( himanta biswa sarma rahul gandhi ) एक युजर म्हणाला की सद्दाम हुसेन हा एक निर्भय माणूस होता जो आपल्या देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी लढला आणि अमेरिकेच्या कटाचा बळी ठरला. इराकचे भारतासोबत चांगले संबंध होत.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.