गांधी नगर ( love jihad ) : गुजरातमधील सुरतमधून एका लव्ह जिहादीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. घटना महावीर कॉलेजची आहे. हिंदू मुलींना सावज बनवून अडकवणाऱ्या जीतू शेखचा पहिला स्टिंग विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना कॅम्पसमध्ये चांगलाच चोप देण्यात आला. ही घटना बुधवारची (23 नोव्हेंबर 2022) आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसात तक्रार न केल्याची बाब समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटना ( love jihad ) महावीर कॉलेजची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, VHP कार्यकर्त्यांना कॉलेजमधून लव्ह जिहादच्या तक्रारी आल्या होत्या. लव्ह जिहादच्या उद्देशाने काही विद्यार्थी हिंदू मुलींना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाली. याची पुष्टी करण्यासाठी विहिंपने स्टिंग केले. यामध्ये ही बाब योग्य असल्याचे दिसून आले.
VHP चे राष्ट्रीय खजिनदार दिनेश नावडिया यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना माहिती मिळाली होती की अनेक लव्ह जिहादी ( love jihad ) मुले सोशल मीडियावर बनावट आयडी तयार करतात आणि हिंदू मुलींशी चॅट करतात. यासोबतच काही विद्यार्थ्यांनी हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती मिळाली होती.
स्टिंगमध्ये जीतू शेख ( love jihad ) OYO हॉटेलमधील मुलींचे फोटो कॅमेरासमोर दाखवत आहे,अशी माहिती मिळते.सोबतच त्याने त्यांना कसे आपल्या जाळ्यात फासले, हे या व्हिडीओतून दिसून येते. या व्हिडीओट आपल्याकडे दोन हिंदू मुलींचे विवस्त्र फोटो असल्याचा दावा करत, जीतुने आपले तीन हिंदू मुलींशी अफेअर असल्याचे सांगितले आहे. कॉलेज प्रशासनाने कॅम्पसमध्ये लव्ह जिहादचे आरोप फेटाळून लावल्याचे वृत्त आहे.