टाटा खरेदी करणार 'बिसलरी'

24 Nov 2022 16:06:00

TATA



Tata-Bisleri Deal :
पाण्याची बाटली खरेदी करताना सहज आपण बिसलरीची मागणी करतो. दुकानदार आपल्याला काय चिकटवेल याचा भरवसा नाही. मात्र, बाटली बंद पाणीविक्रेत्या कंपन्यांमध्ये बिसलरीचं मोठं नाव आहे. मात्र, हीच कंपनी आता विक्रीला निघाली आहे. टाटा कझ्युमर कंपनीशी त्यांचा लवकरच तब्बल सहा ते सात हजार कोटींमध्ये याची विक्री होणार असल्याचे समजते. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण बिसलरी ब्रॅण्ड हा सात हजार कोटींमध्ये टाटांकडे येऊ शकतो.
 
 
बाटली बंद पाण्याच्या बाजारपेठेचा विचार केला तर तब्बल ३२ टक्के हिस्सेदारी बिसलरीकडे आहे. बिसलरीच्या लोकप्रियतेमुळेच बऱ्याचदा छोट्या कंपन्यांनीही आपल्या उत्पादनात बिसलरीशी साधर्म्य असलेल्या बंद पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी आणल्या जातात. यातच कंपनीची लोकप्रियता लक्षात येईल. ग्राहकांना या दृष्टीने साक्षर करण्यासाठीच बिसलरीने जाहिरातीही केल्या होत्या. याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचा हा व्यवहार अखेरच्या टप्प्यात आहे.
 
 
रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डेनॉनसारख्या कंपन्यांनीही यात उत्सुकता दर्शविली होती. मात्र, बिसलरीने अद्याप याबद्दल कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रीया दिली नसली तरीही ही बोलणी अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहेत. हा करार सात हजार कोटींना होणार आहे. बिसलरी मॅनेजमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत. दोन वर्षांपर्यंत व्यवस्थापकीय मंडळ बदलणार नाही.
 
 
बिसलेरीची टाटांची निवड का केली या बद्दल कंपनीने आपल्या एका स्पष्टीकरणात म्हटले आहे की, टाटा कंपनीची निवड करण्याचे कारण म्हणजे 'टाटा कल्चर' हेच आहे. बिसलरी ब्रॅण्ड हे टाटांना पुढे नेऊ शकतो. बिसलरीने टाटा व्यवस्थापनाशी याबद्दल बातचीत केली आहे. टाटा समुह 'बिसलरी' ब्रॅण्डसाठी योग्य निवड असल्याचेही कंपनीला वाढते. या कारणास्तमुळेच कंपनीने टाटांची निवड केली आहे.
 
 
बिसलरी विकण्याची वेळ का आली?


बिसलरी विकण्याचे प्रमुख कारण काय याची चर्चा आता होऊ लागली आहे. दरम्यान, कंपनीनेचे प्रमोटर रमेश चौहान यांनी उत्तराधिकारी नसल्याने हा करार करावा लागत असल्याचे सांगितले आहे. चौहान यांचे वय सध्या ८२ वर्षे आहे. प्रकृतीकारणास्तव त्यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यांच्या मुलीला हा व्यवसायाचा गाडा पुढे चालविण्यात रस नसल्याचे कंपनीने हा पर्याय निवडला आहे.
 

कसा बनला बिसलरी ऐतिहासिक ब्रॅण्ड?

३० वर्षे जूनी कंपनी असलेल्या बिसलरीनं स्वतःचा एक ब्रॅण्ड तयार केला आहे. १९६९मध्ये रमेश चौहान यांनी इटलीतील कंपनी बिसलरीला विकत घेतले होते. त्यावेळेस काचेच्या बाटल्यांतून पाण्याची विक्री केली जात होती. कंपनीची खरेदी करुन सोडा बॉटल ब्रॅण्डमध्ये बदलण्याचा रमेश चौहान यांचा होता. तीन दशकांपूर्वी त्यांनी त्यांचा सॉफ्टड्रिंक व्यवसाय अमेरिकन शितपेय निर्मिती कंपनी कोका-कोलाला विकला. त्यांनी थम्स अप, गोल्ड स्पॉट, सिट्रा, माजा आणि लिम्का सारखे ब्रॅण्ड १९९३मध्ये कंपनीला विकले होते. मात्र, कोका-कोलाला सॉफ्ट ड्रिंक ब्रॅण्ड विकल्यानंतर त्यांनी बाटलीबंद पाणी विक्रीवर लक्ष्य केंद्रीत केले होते. तसेच शुद्ध पाणी निर्मितीसाठी पर्याय दिला होता.




Powered By Sangraha 9.0