भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांनी केला कल्याण दौरा!

24 Nov 2022 17:27:22
madhavi


डोंबिवली: भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांनी बुधवारी कल्याण जिल्ह्याचा दौरा केला. या दिवसभराच्या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक बैठका घेऊन कार्यकत्यांशी संवाद साधला. माधवी नाईक यांच्या या दौऱ्यात प्रामुख्याने डोंबिवली पूर्व, पश्चिम ,ग्रामीण , कल्याण पश्चिम, मोहने, टिटवाळा या भागातील सर्व कार्यकर्ते ,महिला ,युवा, ज्येष्ठ नागरिक, जेष्ठ पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

 
केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा ऊहापोह या बैठकींमध्ये करण्यात आला. त्यांनी अनेक लाभार्थ्यांच्या भेटी घेतल्या. गेले अनेक वर्ष जे पक्षांमध्ये काम करीत आहेत अशा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी देखील त्यांनी घेतल्या. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी जिल्हाध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, के आर जाधव, नाना देवकर, भाई देसाई , कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मंडळाध्यक्ष नंदू जोशी, नंदू परब, नाना सूर्यवंशी, स्वप्निल काटे, संजय मोरे, मंदार हळवे, विशू पेडणेकर, शक्तिमान भोईर, उपेक्षा भोईर, वैशाली पाटील आदी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.‌
Powered By Sangraha 9.0