राऊत सुटले तरी नवाब लटकलेलेच !

24 Nov 2022 19:13:37

नवाब मलिक
 
 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर होणारी सुनावणी पुन्हा एकदा टळली आहे. कुर्ल्यात करण्यात आलेली जमीन खरेदी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांशी संबंध ठेवल्याप्रकरणी नवाब मलिक सध्या कारागृहाची हवा खात आहेत. त्यांच्या जामिन अर्जावर गुरुवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. यावेळी कोर्टाने त्यांना जमीन देण्यास नकार दिला आहे. एकीकडे पत्राचाळ प्रकरणात आरोप असलेले संजय राऊत तुरुंगाच्या बाहेर पडले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मात्र अद्यापही लटकलेलेच आहेत.
 
मलिक यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली. यावेळी झालेल्या सुनावणीत नायालयाने मलिकांना जामीन देण्यास नकार दिल्यामुळे मलिक यांचा कारागृहातील मुक्काम कायम राहणार आहे. न्यायाधीशांनी सदरील प्रकरणी जामिनासाठी पुढील सुनावणीसाठी ३० नोव्हेंबरची तारीख निश्चित केली असून मलिकांना जेल मिळणार की बेल याचा निकाल ३० तारखेलाच लागणार आहे.
 
मलिकांवर नेमके आरोप काय ?
 
ईडीकडून मालिकांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुर्ल्यातील जमीन खरेदी, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जामिना अर्जावर दोन्हीही पक्षकारांकडून मुंबई सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पारकर हिच्याकडून नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0