हिंदू धर्म आवडतो म्हणून स्वीकारला; रामसोबत मुस्कानने केला विवाह!

    24-Nov-2022
Total Views |
Muskan married Ram
 
 
 
रांची ( Muskan married Ram ): झारखंड येथील मुस्कान खातून हिने सनातन धर्म स्वीकारून राम नावाच्या हिंदूशी विवाह केला आहे. सोशल मीडियावर या लग्नाचा बोलबाला आहे. मुस्कानने सांगितले की, तिला सनातन धर्म आवडतो आणि हिंदू धर्म स्वीकारताना तिला खूप आनंद होत आहे. आपले पुढील संपूर्ण आयुष्य मुस्कानने हिंदू म्हणून जगण्याचे ठरवले आहे.
 
मुस्कानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत 
 
राम आणि मुस्कान दोघेही झारखंडच्या गोड्डा येथे राहतात. गोड्ड्याच्या मेहरामात राहून राम अभ्यास करायचा. त्याच परिसरात बिहारमधील भागलपूरची मुस्कान आपल्या आजीसोबत राहते. वर्षभरापूर्वी राम व मुस्कान यांच्यात मैत्री झाली आणि तिचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, मुस्कानचे कुटुंबीय या नात्यावर खूश नव्हते,पण मुस्कानला कोणत्याही किंमतीत रामशी लग्न ( Muskan married Ram )करायचे होते.
 
कुटुंबीयांचा विरोध पाहून दोघेही १७ ऑक्टोबर २०२२ रोजी कोर्ट मॅरेजसाठी गोड्डा येथे पोहोचले. मुस्कानच्या घरच्यांना हा प्रकार कळला आणि ते न्यायालयाच्या आवारात पोहोचले आणि मुलीशी भांडू लागले. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत मुलीला संरक्षण दिले. मी स्वतःच्या इच्छेने रामसोबत लग्न करत आहे, असे मुस्कानने कोर्टात सांगितले. सोबत मुस्कानने ( Muskan married Ram )आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत न्यायालयाकडे संरक्षण मागितले.
 
 
हर हर महादेवच्या जयघोषात लग्न
 
कोर्टात जबाब दिल्यानंतर मुस्कान व रामला पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. यानंतर दोघे भागलपूरला पोहोचले. भागलपूरच्या पिरपेंटी येथे असलेल्या मीनाक्षी मंदिरात गावकऱ्यांच्या उपस्थितीत मुस्कानने सनातन धर्म स्वीकारणाऱ्या राम कुमार मंडळाशी ( Muskan married Ram ) विवाह केला.
 
 
वैदिक मंत्रोच्चार आणि हर हर महादेवाच्या जयघोषात हा विवाह सोहळा पार पडला. दरम्यान, ग्रामीण महिलांनी पारंपरिक विवाह गीतेही गायली. मुलाच्या कुटुंबीयांनी दोघांचाही स्वीकार केला आहे. हा विवाह ( Muskan married Ram ) पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सोशल मीडियावरही या लग्नाची बरीच चर्चा होत असून लोक या जोडप्याला त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.