ऐरोलीतील मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या जागेची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी!

24 Nov 2022 17:13:40
udya samant


ठाणे
: महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नवी मुंबईतील ऐरोली येथील प्रस्तावित मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या भूखंडाची पाहणी केली आणि पुढील पंधरा दिवसात मराठी भाषा भवनाचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले.


ऐरोलीतील भूखंड क्र.६ अ येथे मराठी भाषा भवन उपकेंद्राची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. या जागेची आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता श्री. तुपे यांच्यासह शालेय शिक्षण विभाग, उद्योग विभाग व मराठी भाषा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, ऐरोलीच्या या भूखंडावर मराठी भाषा भवनच्या उपकेंद्र उभारणीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. या उपकेंद्रात मराठी भाषा संदर्भातील महामंडळे, इतर कार्यालये असणार आहेत. हे भवन उभारण्यासाठी महापालिकेच्या मंजुरीसंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.यावेळी सामंत यांनी प्रस्तावित भवनाच्या आराखड्याची माहिती घेतली. लवकरच भूमीपूजन करून काम सुरू करण्यासंदर्भातील तयारीचा आढावा घेतला.




Powered By Sangraha 9.0