२५ गाईसाठी मध्यरात्रीचं खुलं झालं द्वारकाधीश! कारणही आहे खास

24 Nov 2022 18:29:47
गाई


मुंबई :
भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीच्या इतिहासात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. द्वारकाधीश मंदिराचे दरवाजे हे मध्यरात्री उघण्यात आले हे दरवाजे कोणत्याही व्हीआयपीसाठी नाही तर 25 गायींसाठी उघडण्यात आले होते. या गाई त्यांच्या मालकासह ४५० किलोमीटरचा पायी प्रवास करून कच्छहून द्वारकेला पोहोचल्या होत्या.


कच्छमध्ये राहणाऱ्या महादेव देसाई यांच्या गोशाळेतील २५ गायींना सुमारे दोन महिन्यांपूर्वी लम्पी विषाणूची लागण झाली होती.त्यामुळेच महादेव देसाई यांनी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाकडे नवस मागितला होता की, "जर माझ्या गाई लम्पी या आजारातून बऱ्या झाल्या तर या गाईना घेऊन मी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला येईल."



गाई


दिवसभर हजारो भाविकांची गर्दी असल्याने मंदिर प्रशासनासमोर सर्वात मोठी अडचण होती की गाईना मंदिरात प्रवेश कसा द्यावा. अशा स्थितीत गाईच्या आगमनामुळे मंदिराची व्यवस्था बिघडली असती. त्यामुळेच मंदिर मध्यरात्री उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. भगवान श्रीकृष्ण हे फक्त गोमातेचे भक्त होते, त्यामुळे रात्रीच्या वेळीही ते त्यांना दर्शन देऊ शकतात असा विचार करून रात्री १२ वाजल्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.अशाप्रकारे गाईनी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.

महादेव म्हणतात की "द्वारकाधीशकडे नवस मागून आणि भगवान श्रीकृष्णवर विश्वास ठेवून मी गाईच्या उपचारात गुंतलो. काही दिवसांनी गाई चांगल्या होऊ लागल्या. सुमारे २० दिवसांनंतर सर्व २५ गायी पूर्णपणे निरोगी झाल्या. एवढेच नाही तर गोशाळेतील इतर गायींमध्येही लम्पी विषाणूचा संसर्ग पसरला नाही.


गाई 2


जनावरांमध्ये लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता बहुतांश गावातील जनावरांमध्ये विषाणूची लक्षणे दिसू लागली आहेत. खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू करून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व जनावरांच्या बाजारात विक्री व खरेदीला बंदी घालण्यात येणार आहे. तसेच जनावरांची वाहतूक करता येणार नाही. जिल्ह्यातील ८७ गावांतील सुमारे २५२ गाईमध्ये लम्पी विषाणूची लक्षणे आढळून आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. रोगाचा वाढता प्रभाव पाहता लसीकरणही वेगाने केले जात आहे.अशा परिस्थिती महादेव देसाई यांच्या गोशाळेतील २५ गाई लम्पी या आजारातून बऱ्या होतात यापेक्षा आनंदाची बातमी दुसरी कोणतीच असू शकत नाही .



Powered By Sangraha 9.0