कट्टरतावाद्यांनी केली दलित तरुणाची हत्या; कथित आंबेडकरवादी गप्प का?

24 Nov 2022 17:59:30
स्वप्नील
 
 


नांदेड : श्रद्धा वालकर या दलित तरुणीची आफताब अमीन पूनावालाने केलेल्या हत्येचे प्रकरण ताजे असताना राज्यातील आणखी एका दलित तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नांदेड येथील देगावचाळ परिसरात राहणाऱ्या स्वप्नील नागेश्वरचे एका तरुणीशी प्रेम संबंध होते. त्यातून शायजाद खान एजाज खान, महम्मद सद्दाम महम्मद कुरेशी, महम्मद उसामा महम्मद साजिद कुरेशी, शेख आयान शैख इमाम, सोहेल खान साहेब खान, सय्यद फरहान, उबेद खान युनूस खान या आरोपींनी स्वप्नीलची बेदम मारहाण करून हत्या केली.
 
 
स्वप्निल शेषराव नागेश्वर (३०) या ऑटोचालकाची दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता हत्या (Dalit boy killed by mob) झाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील ७ आरोपींच्या अवघ्या ४८ तासांत मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील संबंधित मुलीसह फिरायला गेला असताना सायजाद खान व त्याच्या गुंड मित्रांनी त्या दोघांना गाठले पुढे “तू पोरीला हॉटेलवर घेऊन जातो का?’ असे म्हणत स्वप्निल व त्याच्यासोबतच्या महिलेस बळजबरी ऑटोत कोंबले आणि नदीकाठी उर्वशी मंदिराजवळ असलेल्या दर्ग्यासमोर नेल्यावर त्याची लाठ्या काठ्यांनी हत्या करण्यात केली.



 
 
भाजप राष्ट्रीय सचिव आणि आंध्रप्रदेश सहप्रभारी सुनील देवधर यांनी स्वप्नीलच्या हत्येप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देत, मुग गिळून गप्प बसलेल्या कथित आंबेडकरी नेत्यांना जळजळीत बोल सुनावले आहेत. देवधर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले कि, स्वप्नीलची मुस्लीम टोळक्याने अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. या प्रकरणी गप्प राहून कथित आंबेडकरवाद्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि दलितांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले व आपल्या खबऱ्यांंमार्फत आरोपींची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेतले. स्वप्नीलशी प्रेमसंबंध असलेल्या महिलेचा जबाबावर पुढील तपासाची दिशा ठरेल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0