ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर आशा मामिडी यांचा मोठा गोपयस्फोट !

24 Nov 2022 18:32:01

आशा मामिडी
 
 
 
 
मुंबई : उ. बा. ठा. गटाच्या उपनेत्या आशा मामिडी यांनी पक्षातून बाहेर पडत बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला आहे. अलीकडेच त्यांना उपनेतेपद देण्यात आले होते. त्यामुळे पद असताना देखील पक्ष का सोडला असा प्रश्न असताना त्यांनी माध्यमांसमोर कारण स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी पक्षातील महिला नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. मातोश्रीचं किचन माझ्या हातात आहे, असं म्हणणाऱ्या महिला नेत्याला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
 
दरम्यान, आशा मामिडी म्हणाल्या, "शिवसेना सोडण्याचं दु:ख आहे. पण नाईलाज आहे. शिवसेनेच्या उपनेत्या मीना कांबळी या एका बाईमुळे मी पक्ष सोडत आहे. मीना कांबळी ही गद्दार बाई आहे. मातोश्रीचं किचन माझ्या हातात आहे, असं सर्व पदाधिकाऱ्यांना ही बाई बोलत असते. म्हणजे रश्मी वहिनींच्या नावावर ही महिला काय काय करत असेल याचा विचार न केलेला बरा. मीना कांबळी या महिला पदाधिकाऱ्यांकडून गिफ्ट मागतात. मीना कांबळी आणि विशाखा राऊत या पक्ष आपल्याच हातात आहेत, असं वागतात. अनेक महिला या दोघीना कंटाळल्या आहेत." असे म्हणत त्यांनी पक्ष का सोडल्याचे कारण स्पष्ट केले.
 
 
पुढे त्या म्हणाल्या, मला जबाबदारीने पद दिलं होतं. मी खूश होते. मी तिकीट मागायला गेले नव्हते. पद मागायला गेले नव्हते. मी कामाठीपुऱ्यात काम करत होते. महिला माझ्यासोबत काम करायला येत होत्या. तेव्हा त्यांना अडवलं जायचं. पदावरून काढण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्या शिंदे गटातून एमएलसी मागत असल्याचं कळतं. त्या दागिने, कोंबडी वडे आणि साड्यांचे गिफ्ट मागत असतात. त्यावरच त्या समाधानी असतात. आमचं खच्चीकरण केलं जातं." अशी पोलखोल आशा मामिडी यांनी केली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0