कार्तिक आर्यनने वाढदिवसानिमित्त देवदर्शनानंतर आयोजित केली ग्रँड पार्टी

    23-Nov-2022
Total Views |

kataraya
 
मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनने काल त्याच्या वाढदिवसानिमित्त आपलया खास दिवसाची सुरुवात सिद्धिविनायक मंदिरात देव दर्शनाला जाऊन केली. त्यानंतर एक विशेष आणि मोठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीने त्याने त्याचे यशस्वी वर्षदेखील साजरे केले. या बर्थडे कम सेलिब्रेटरी बॅशमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनी हजेरी लावत पार्टीची शोभा वाढवली. तसेच, या पार्टीसाठी पांढरी थीम ठेवण्यात आली होती.
 
पार्टीमध्ये कार्तिकच्या कुटुंबासोबत आलेल्या पाहुण्यांची यादीही पाहण्यासारखी होती. वाणी कपूरपासून, दिशा पटानी ते अनन्या पांडेपर्यंत सगळ्यांनीच पार्टीमध्ये उपस्थिती लावली. तसेच, या पार्टीमध्ये आयुष्मान खुराना, आयुष शर्मा, शर्वरी वाघ, कार्तिकची 'फ्रेडी' को-स्टार अलाया एफ, जॅकी भगनानी आणि मुकेश छाब्रा यांचादेखील समावेश होता. या सेलिब्रेशनमध्ये, जिथे अभिनेत्रींनी पांढऱ्या रंगाचे सुंदर गाऊन घातले होते, तिथेच अभिनेत्यांना सूटमध्ये पाहायला मिळाले.
 
कार्तिक आर्यनच्या या बर्थडे कम सेलिब्रेटरी बॅशमध्ये इंडस्ट्रीतील अनेक चित्रपट निर्मातेही दिसले. 'भूल भुलैया 2'चे दिग्दर्शक अनीस बज्मी, निर्माते भूषण कुमार आणि मुराद खेतानीपासून 'शेहजादा'चे दिग्दर्शक, रोहित धवन आणि निर्माता, अमन गिल तसेच 'धमाका'चे दिग्दर्शक राम माधवानी यांचादेखील पार्टी मध्ये समावेश असून, जुहू येथील एस्टेला येथे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मेगा बॅशमध्ये ओम राऊत, कबीर खान, सुभाष घई, आशुतोष गोवारीकर, लव रंजन, साजिद नाडियादवाला आणि रमेश तौरानी यांच्यासह अनेक चित्रपट निर्मात्यांनी हजेरी लावली. कार्तिक भलेही आऊटसायडर असेल, पण आज तो सर्वात प्रिय आणि प्रसिद्ध सुपरस्टार्स पैकी एक बनला असून, या अभिनेत्याला चित्रपट निर्मात्यांची पसंती आणि मागणी मिळत आहे.
 
बॉलीवूडला बॉक्स ऑफिसवर पुनरुज्जीवित करणारा चित्रपट 'भूल भुलैया 2'च्या यशाने तो वर्षातील चर्चेचा विषय बनला आणि तेव्हापासून अनेक चित्रपटांची घोषणा करण्यात आली. पांढर्या2 जीन्स आणि सैल पांढर्या् शर्टवर डिझाईनसह कार्तिक आर्यन त्याच्या मॅक्लारेन जीटीमधून अत्यंत प्रभावशाली ऐटीत आला.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.