‘या’ चित्रपटाच्या प्रयोगासाठी २५ दिवस आधीपासून बुकिंग सुरु.. २४ तास चालणार स्ट्रीमिंग

    23-Nov-2022
Total Views |

avtar 2
 
मुंबई : अवतार २ हा चित्रपट १६ डिसेम्बरपासून देशात प्रदर्शित होत आहे. देशातील काही शहरांत या चित्रपटाचे प्रयोग २४ तास चालू राहणार आहेत. तसेच याचा पहिला प्रयोग मध्यरात्री १२ वाजता सुरु होणार आहे. जेम्स कॅमरून यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
 
 
मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट स्पेशल इफेक्ट्स, VFX आणि बॅकग्राऊंड स्कोरसाठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करणार, असा अंदाज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. अवतार 2 मध्ये काही नवीन कलाकारांचीही एण्ट्री झाली आहे. यामध्ये टायटॅनिक फेम केट विंसलेट आणि क्लिफ कर्टिस यांचाही समावेश आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 
 
अवतार फ्रँचाइजीमधला पहिला चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले होते. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल 19 हजार कोटी रुपयांची कमाई केली होती.
 
 
या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 14 वर्षे झाली असली तरी कमाईच्या बाबतीत हा चित्रपट अजूनही अग्रस्थानी आहे. त्याचा विक्रम कोणताच चित्रपट अद्याप मोडू शकला नाही. यामध्ये सॅम वॉशिंग्टन, जोई सल्डाना, स्टीफन लँग यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.