फक्त सरकारनं आदेश द्यावा पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी तयार!

23 Nov 2022 11:10:51



फक्त सरकारनं आदेश द्यावा पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी तयार!
जम्मू : पाकव्याप्त काश्मीर पुन्हा परत घेण्यास आपण तयार असून फक्त सरकारच्या एका आदेशाची प्रतीक्षा आहे, अशी प्रतिक्रीया उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टिनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिले आहे. उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टिनंट जनरल उपेंद्र द्विवेदींनी पाकव्यापक्त काश्मीर संदर्भातील हे मोठं वक्तव्यं केलं आहे. ते म्हणाले, "कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठे बदल झाले आहेत. पाकिस्तानातून पसरविलेल्या जाणाऱ्या दहशतवादालाही चाप बसला आहे. तसेच आम्ही सरकारच्या एका आदेशाची वाट पाहत आहोत. सेना पीओकेवर कारवाईसाठी तयार आहे."
ते म्हणाले की, "दहशतवादी कधीही आपला हेतू साध्य करू शकणार नाहीत. तसेच ते म्हणाले की, "पीओकेवर संसदेत प्रस्ताव प्रलंबित आहे. यात काहीच नवे नाही. भारतीय सैन्य सरकारच्या प्रत्येक आदेशाची पूर्तता करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सरकार कधीही आदेश देईल तेव्हा आम्ही तयार असू, असेही ते म्हणाले. महिन्याभरातील दुसऱ्यांदा अशा प्रकारचे वक्तव्य समोर आले आहे. यापूर्वी राजनाथ सिंह यांनीही पीओके बद्दल केलेल्या सूचक विधानाने साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या होत्या.
जम्मू-कश्मीरमध्ये होणाऱ्या टार्गेट किलिंगबद्दलही द्विवेदींनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, राज्यातील दहशतवाद रोखण्याचे कार्य व्यापक प्रमाणात सुरू आहे. ज्यामुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे ते कधी पिस्तुल किंवा तत्सम हत्यारांनी निशस्त्र निःष्पाप नागरीकांना लक्ष्य केले जात होते. मात्र, त्यांचा हा हेतू कधीही साध्य होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानातून ड्रग्ज तस्करी सुरू
पाकिस्तान सतत काश्मीरवाटे ड्रग्ज विकण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही यापूर्वी कोट्यवधींचा ड्रग्जसाठा जप्त केला होता. तसेच सीमाभागांत जे दहशतवादी ठार करत आहोत. त्यातील अधिकजण ड्रग्ज तस्कर असल्याचेही निष्पन्न झाले आहे. याचा अर्थ पाकिस्तान आता ड्रग्ज कारभाराचा विस्तार सीमाभागात करत आहे.", असेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0